भव्य शिवसेना पक्ष प्रवेश सोहळा डॉ. दिनेशभाऊ परदेशी यांची प्रचारामध्ये मोठया प्रमाणे आघाडी

नाशिक प्रतिनिधी / डॉ. शेरूभाई मोमीन




 वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघातील मौजे "भायगाव" ता. वैजापूर येथील, सर्व समस्त, कार्यकर्ते व ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी आज, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी शांताराम दळवी,दगडू मोरे दोडेराम मोरे,सोनु भाऊ पवार,दगू मोरे रामदास मोरे,भाऊराव पवार, अशोक दळवी,अशोक मोरे,भाऊराव मोरे,नाना मोरे,गणेश मोरे,गणेश निकम,विठ्ठल बागुल,विलास बागुल, संदीप बागुल,संजय सोनवणे,अनिल सोनवणे,पांडुरंग मोरे,राजू मोरे,संजू मोरे, लिंबाजी मोरे,दादा मोरे,यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश करून जल्लोषात स्वागत केले.
यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, सर्व सामान्यांचे कैवारी, आदर्श समाज भूषण मा. श्री. डॉ. दिनेशभाऊ परदेशी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन साहेबराव आण्णासाहेब औताडे, वैजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मंजाहरी पा.गाढे,पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत,विशाल भाऊ शिंदे,बाळासाहेब जानराव,गणेश कदम,संदीप थोरात, फेरोज खान, आदी सह सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ हितचिंतक, मित्र परिवार मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

Comments