रफअत हुसैन यांची उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी नियुक्ति.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /  फहीम शेख



लोकसभा निवडणुकीच्या बिगुल आणी थेट प्रदेशाध्यक्ष कडुन ही नियुक्ती राजकीय दृष्ट्या महत्वाची ठरवू शकते.
वर्ष 2012 मध्ये नांदेड महापालिका निवडणुकीत आपली एन्ट्री महाराष्ट्रात करणारी एम आई एम ची धुरा महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोपरा म्हणजे नंदुरबार येथून आपले मोजके सहकार्यांसोबत सांभाळून फक्त पंधराच दिवसात फळी उभारून नंदुरबार नगर पालिका निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमीदवार देऊन सर्व तथाकथित सेक्युलर पक्षांना आश्चर्यचा धक्काच दिला.
त्या निवडणूकित झालेल्या प्रचार ने पक्षाची उत्तर महाराष्ट्रासह नंदुरबारच्या सीमेला लागलेले मध्य प्रदेश व गुजरात राज्याचे असलेलं जिल्हयांमध्ये ही जबरदस्त ओळख झाली. नंदुरबार येथून पक्षाचे कार्य सुरु करणारे सैय्यद रफअत हुसैन यांनी पक्षाचे ध्येय धोरण सहित संविधान व कायद्याच्या हद्दीत राहुन राजकारणात हिस्सा घ्या हे ओवैसी बांधवांचे घोषवाक्य जाणसामान्यांपर्यंत पोहोचवीण्याकारिता आपले सर्वस्व पणाला लावले.
एक काळी प्रस्थापितांच्या भीतीमुळे कोणी मंच वर येण्याची हिम्मत करत न्हवते, परंतु त्यांनी आपले मोजके सहकारीसह सुरवात करून शहादा नगर पालिकेत 2016 मध्ये आपले 4 उमेदवार उभे करून चारही जिंकून आणले व सत्तेची चावी आपल्या हाती घेतली, तसेच अक्कलकुवा येथे फेर निवडणुकीत थेट जनतेतून एम आई एम ची महाराष्ट्रात पहिली आदिवासी समाजाची सरपंच निवडून आणली. सामाजिक क्षेत्रातही त्यांची मजलीस टीमने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात मजलीस च्या नावाने ना नफा ना तोटा यावर पहिली रुग्णवाहीका सुरु केली जी सुमारे 10 वर्षांपासुन कार्यरत आहे, एक 05 बेडचे ओवैसी हॉस्पिटल कायम केले.
दारुस्सलाम हैदराबाद सारखे त्यांचे कार्यालय सर्वांसाठी नेहमी उघडे आहे जिथे धर्म जातं समाज ना बघता समस्या घेऊन आलेल्याची बघितली जाते.
सुमारे 12 वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक राजकीय उतार चढाव बघितले असुन ऐन लोकसभा निवडणुकीच्या पाश्चर्वभूमीत जिथे पक्ष वरिष्ठ धुळे मालेगाव लोकसभा सीट लडवन्याचे घोषित करत आहे ह्या वेळेस रफअत हुसैन यांना पक्ष वरिष्ठानकडून उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पद बहाल करने म्हणजेच पक्षाने अत्यंत गंभीरतेने धुळे मालेगाव लोकसभा सीट साठी मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसते.
रफअत हुसैन यांच्याशी संपर्क साधले असता त्यांनी सर्वात पहिले अल्लाहचे व नंतर पक्ष वरिष्ठांचे आभार व्यक्त केले व सांगलीतले की पक्ष श्रेष्ठींनी जो विश्वास माझ्यावर दर्शवलं आहे त्यावर मीं काटेकोरपणे खरा उतरण्याचे प्रयत्न करेल.
त्यांना बढतीची माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व औरंगाबादचे खासदार सैय्यद इम्तियाज जलील यांनी काल संध्याकाळी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून ट्विट करून दिली, त्यांचे ट्विट व्हायरल होताच सगळीकडून शुभेच्छांचे वर्षाव होत आहे.

Comments