नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
रनाळे येथील शनिमांडळ रस्त्यालगत इंदिरानगर मध्ये हजरत गौबानशहा बाबा दर्गा आहे सदर दर्गा हिंदू मुस्लिम एकीचे प्रतीक मानली जाते रमजान ईदच्या आदल्या रात्री अज्ञात कडून समाधी स्थळ (तूरबत) ची तोडफोड करण्यात आली दर्गा मधील समाधी स्थळाची तोडफोड झाली असल्याची सकाळी सहा वाजता निदर्शनात आले गावातील सर्वच मुस्लिम समाज दर्ग्याच्या दिशेने धावले एकवरले पोलीस प्रशासन माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री दत्त. एस अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, एलसीबी चे खेळकर, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, अविनाश केदार, प्रतीक गरांगे यांच्यासह पोलीस फौज फाटा मोठ्या संख्येने घटनास्थळी हजर झाले व शांततेचे आवाहन केले उपस्थितांना रमजान ईद ची नमाज पठण करण्याची विनंती केली मुस्लिम समाजाच्या वतीने आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी केली त्यानंतर ईद ची नमाज सकाळी साडेदहा वाजता ईदगा च्या ऐवजी मशिदीत पठाण करण्यात आली
Comments
Post a Comment