शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे देण्यावेळी चौधरी बंधूंनी कर्जबाजारी असल्याचे केले ढोंग,

अमळनेर प्रतिनिधि सत्तार खान 

अमळनेर:- शहादा येथील शेतकऱ्यांना फसवणाऱ्या चौधरी बंधूनी मात्र निवडणुकीसाठी बक्कळ पैसा उभारला असून शेतकऱ्यांचा कष्टाचा पैसा पचवणाऱ्या चौधरी बंधूचे बुच्चन लावून बाटली परत पाठवण्याची वेळ आली असल्याचे मत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
           स्वतःच्या नंद नगरीत जनतेने सपशेल नाकारल्याने पैसे देऊन विकत घेऊ या भ्रमात चौधरी बंधूंनी साने गुरुजींच्या कर्मभूमीत पाऊल ठेवले. तालुक्याची जनता आपल्या डावपेचांना बळी पडत नाही हे पाहून त्यांनी जाती जातीत विष पेरत तालुक्यात फूट पाडली. पाचशे रुपये देऊन नवा पायंडा अमळनेर मतदारसंघात त्यांनी पाडत निवडणूक जिंकली. आणि तालुक्यात आपले अवैध धंदे विस्तारित करण्यास सुरुवात केली. मात्र ह्या विषारी धंद्याने अनेकांचा बळी घेतला. पाच वर्षांतच जनतेने त्यांना आधी नगरपालिका नंतर विधानसभेच्या निवडणुकीत तोंडघशी पाडले. कार्यकर्त्यांना व नेत्यांना वाऱ्यावर सोडत त्यांनी पुन्हा नंद नगरी गाठली. मात्र स्वतःच्या जिल्ह्यातील शहादा तालुक्यात साखर कारखाना विकत घेवून तिथेही घाण केली. पुन्हा निवडणूक लागल्याने आपल्या काळया धंद्याचा पैसा काढून अमळनेरची वाट धरली. मात्र आता ऐन निवडणुकित शहादा येथील कारखान्यात अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा खुलासा मेधा पाटकर यांनी केल्याने चौधरी बंधूंना तोंड लपवायला जागा उरली नसून त्यांना शेतकरी जाब विचारतानाचा व्हिडिओ ही व्हायरल झाला आहे. आधी सूतगिरणी आणि आता शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने चौधरी बंधू तोंडघशी पडले आहेत. अश्या विश्र्वासघातकी लोकांना परत पाठवण्याची वेळ आली असल्याचे तालुक्यातील जनताच बोलून दाखवत असल्याचे भागवत पाटील यांनी सांगितले आहे.

Comments