अमळनेर प्रतिनिधि सत्तार खान
दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल येथे *रंगोत्सव* या राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत शाळेने व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संपादणूक व पुरस्कार प्राप्त केले आहे.
रंगोत्सव ही अशी एक राष्ट्रीय स्पर्धा आहे की जी जागतिक पातळीवर विविध कला स्पर्धा आयोजित करून जगभरातील तरुण कलाकारांना प्रेरणा देते. रंगोत्सव कला स्पर्धा ही सर्जनशीलतेचा एक उत्साही उत्सव आहे जी सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ देते. चित्रकला आणि रेखांकनापासून स्केचिंग पर्यंतच्या विविध श्रेणीसह स्पर्धा कलात्मक कौशल्यांच्या विस्तृत स्पेक्ट्रममधील विद्यार्थ्यांना आकर्षित करते.
अशा या स्पर्धेत शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी देखील विशेष सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांनी रंगभरण, हस्ताक्षर, स्केचिंग, कार्टून मेकिंग,फिंगर अँड थम्ब पेंटिंग, केरीकेचर अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन उत्कृष्ट बक्षीसे प्राप्त केली आहे.त्यानिमित्ताने शाळेत *रंगोत्सव : पारितोषिक वितरण समारंभ* आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ.मंदाकिनी भामरे मराठी विभाग प्रमुख प्रताप कॉलेज तसेच सरपंच,लोन, संस्थेचे चेअरमन श्री. उत्कर्ष पवार, सचिव सौ.अलका पवार आणि उपाध्यक्ष श्री. उमाकांत पाटीलउपस्थित होते. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बक्षीस वितरणात सुरवात करण्यात आली.
रंगोत्सव तर्फे शाळेला एक उत्कृष्ट शाळा म्हणून "Best School For Futuristic Education Award" प्राप्त झाले आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा सोहिते यांना "Remarkable Contribution in Art and Education Award" तर
कलाशिक्षिका म्हणून शिक्षिका मनीषा सोनार यांना "कलाविभूषण" पुरस्कार प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनीही प्रमाणपत्रासह गोल्ड, सिल्वर,ब्रॉन्झ अशी पदके प्राप्त केली आहेत. सहभागी एकूण विद्यार्थ्यांपैकी 40 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल प्रमुख पाहुण्यांकडून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले.सौ मंदाकिनी भामरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या या यशाबद्दल स्वतःकडून बक्षीस जाहीर केले.
संस्थेच्या सचिव सौ.अलका पवार व मुख्याध्यापिका सौ. वर्षा सोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्वाती चव्हाण व मनीषा सोनार यांनी केले तर स्वागतगीत गायन पल्लवी येवले व संगीता पाटील यांनी केले. शिक्षिका योगिता फाळके,प्रतीक्षा पाटील, कविता पाटील, मनीषा ठाकूर, रोशनी महाजन तसेच शिक्षकेतर कर्मचारी योगिता पारधी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment