आमदार रितेश राणे विरुद्ध जळगाव येथे गुन्हा दाखल करा यासाठी एकता संघटन तर्फे निदर्शने

अमळनेर प्रतिनिधि सत्तार खान 


आमदार नितेश राणे यांनी १ सप्टेंबर रोजी अहमदनगर येथे मुस्लिम समाजा विरोधात द्वेष युक्त असे भाषण केल्याने तसेच मशिदीत घुसून मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या विरोधात ३ सप्टेंबर रोजी जळगाव पोलीस अधीक्षक,पोलीस उप विभागीय अधिकारी तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सुद्धा गुन्हा दाखल होत 
नसल्याने तसेच त्यांना अद्याप अटक न केल्याने जळगावात जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर दुपारी १२ ते १३ वाजेपर्यंत जळगाव जिल्हा एकता संघटन मार्फत निदर्शने करण्यात आली.

*निदर्शनात दिल्या घोषणा*

आमदार नितेश राणे मुर्दाबाद, नितेश राणे यांची आमदारकी रद्द करा, नितेश राणे यांना अटक करा, नितेश राणे विरुद्ध जळगाव येथे गुन्हा दाखल करा अशा वेगवेगळ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

*जिल्हाधिकारी यांना तक्रार सादर*
सुप्रीम कोर्टाने याचिका क्रमांक ९४०/२२ दिनांक २१/१०/२२ च्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की *जर कोणाही व्यक्तीने द्वेष युक्त भाषण केल्यास तो कोणताही धर्माचा असो त्याच्या विरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून भारताचे धर्मनिरपेक्ष चारित्र्य जपले जाईल* यानुसार जळगाव पोलिसांनी बी एन एस कायद्या च्या कलम १९६, १९७, २९९ व ३५३ अनुसार तक्रार दाखल करावी अन्यथा सदर बाब न्यायालयाचा अवमान म्हणून संबंधिता विरुद्ध न्यायालयात जाण्याबाबत एकता संघटने निवेदनात नमूद केले आहे.
 
*निवेदनावर कारवाईचे आश्वासन* 

निवेदन वजा तक्रार जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी पाटोळे यांनी स्वीकारून सदर बाबत पोलीस अधीक्षक जळगाव यांना आवश्यक ते आदेश देण्यात येतील असे आश्वासन आंदोलनकर्ते यांना दिले
*निदर्शनात यांची होती उपस्थिती*
 
मुफ्ती खालीद व मुफ्ती अबुजर यांच्या नेतृत्वात मौलाना रहीम पटेल व मौलाना तौफिक शरीफ शाह यांच्या मार्गदर्शनात फारुक शेख अब्दुल्ला, नदीम मलिक, मजहर पठाण, अहमद सर, सलीम इनामदार, युसुफ खान, आरिफ देशमुख ,बाबा देशमुख, भुसावळ चे नगरसेवक इम्तियाज शेख, एरंडोल चे सामाजिक कार्यकर्ते असलम पिंजारी व रहीम खान, शिरसोलीचे जामा मस्जिद चे अध्यक्ष महमूद पिंजारी, पारोळ्याचे जुबेर खान,आरिफ अजमल, मौलाना कासिम, युसुफ शाह, अनिस शहा ,जकी पटेल, शीबान फाईज, मोहसीन युसुफ, मुजाहिद खान, रिजवान हरीश, ताहेर शेख, एडवोकेट आमिर शेख, मोहम्मद इस्माईल , तन्वीर शेख, अकील अहमद, आवेश शेख आदींचा सहभाग होता.

१) निवासी उपजिल्हाधिकारी पाटोळे यांना निवेदन देताना मुफ्ती खालीद सोबत शिष्टमंडळ दिसत आहे 
२)जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर निदर्शनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधत असताना आंदोलन कर्ते 

३) पत्रकारांशी वार्ता लाप करताना फारुक शेख , नदीम मलिक, मजहर खान, तौफिक  शहा, सलीम इनामदार, युसुफ खान, अहमद सर आदि दिसत आहे

Comments