व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी...

अमळनेर प्रतिनिधि सत्तार खान 

          अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै श्री दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधाची वेशभूषा परिधान करत जन्माष्टमी उत्सवाचा आनंद लुटला.यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.उत्कर्ष पवार, सचिव सौ. अलका पवार तसेच उपाध्यक्ष श्री. उमाकांत पाटील उपस्थित होते.
                       याप्रसंगी भगवान श्रीकृष्ण आणि दहीहंडी यांच्या प्रतिमांसह शाळेचे मैदान सुशोभीत करण्यात आले होते. शाळेचे चेअरमन श्री. उत्कर्ष पवार आणि सचिव सौ.अलका पवार यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे व दहीहंडीचे पूजन करण्यात आले.
                     शाळेतील सर्वच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधा- कृष्णाच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या त्यामुळे संपूर्ण शाळा गोकुळमय झाली होती. श्रीकृष्णाचे चरित्र,श्रीकृष्णाची माहिती तसेच  श्रीकृष्णाची रासलीला याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. "गोविंदा रे गोपाळा....." अशा अनेक जन्माष्टमी गाण्याच्या तालावर विद्यार्थी व शिक्षकाने नृत्य केले. यानंतर विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीचा प्रसाद वाटप करण्यात आला.                शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा सोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षिका योगिता फाळके, पल्लवी येवले, मनीषा सोनार,संगीता पाटील, स्वाती चव्हाण,प्रतीक्षा पाटील, कविता पाटील,मनीषा ठाकरे,रोशनी पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी योगिता पारधी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमूल्य सहकार्य लाभले.

Comments