धुळे शहरातील नगावबारी गावा जवळ राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही एसी ,बसला भीषण आग


अंमळनेर सत्तार खान (प्रतिनिधी)

बुधवारी
(दि.२२) सकाळी सुमारे १२ वाजा भीषण आग लागल्याची घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना वेळीच बसमधून खाली उतरविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबारहून धुळ्याकडे येणारी शिवशाही एसी ,बस सकाळी सुमारे बारा वाजता धुळ्यात दाखल झाली. नगावबारी परिसरातील उड्डाणपुलाजवळील सर्व्हिस रस्त्यावर बस वळत असताना चालकाच्या केबिनमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याचे निदर्शनास आले. धोका ओळखत चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरण्याचे एसटी बस चे वाहक साजिद शेख यांनी आवाहन केले.
धुळ्याहून अग्निशामंन दळाची गाडी आली आग उजवली

Comments