सोनगीर येथे उड्डानपुलाच्या कामामुळे वाहतुकीची कोडी वाहनांच्या रांगा; चालक कमालीचे त्रस्त

अमळनेर सत्तार खान



 मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाघाडी फाट्यावर बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, या विकासकामामुळे मुख्य रस्त्याची वाहतूक बाजूला बांधण्यात आलेल्या काँक्रीटच्या सर्व्हिस रोडवर वळवण्यात

दि.१७/७

आली आहे. या सर्व्हिस रोडची रुंदी अत्यंत कमी जअसल्याने एका वेळी केवळ एकच वाहन जाऊ शकते, परिणामी या भागात वाहनांची ग/ती मंदावून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत ज्ञआहे.

शिरपूरकडे जाणाऱ्या उड्डानपुलाच्या कामामूळे वाहतुकीची कोंडी अनेकदा सोनगीर फाट्यापर्यंत पोहोचत असल्याने

वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी अनेक लहान वाहनचालकांनी आता सोनगीर गावातून जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचा वापर सुरू केला आहे. वाहनचालक एन. जी. बागुल हायस्कूलच्या पाठीमागील रस्त्याने गांधी चौक, ग्रामपंचायत चौक आणि समाधी मार्गे ढेरे संकुलाजवळ पुन्हा महामार्ग गाठत आहेत, तर काही चालक दर्या जवळील रस्त्याने संत सावता चौक व जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या मार्गाचा वापर करत आहेत. गावातील या रस्त्यांवर आनंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच ढेरे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय असल्याने दिवसभर लहान-मोठ्या विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. गावात अचानक वाढलेल्या या जड व लहान वाहनांच्या वर्दळीमुळे स्थानिक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे.

दुसरीकडे, शिरपूरकडून सोनगीरकडे येताना मूळ रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहने जाताना मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. या उडणाऱ्या धुळीचा प्रचंड त्रास लगतच्या बालाजी नगर आणि लक्ष्मी नगर भागातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या धर्तीवर येथेही रस्ता कामाच्या ठिकाणी तात्काळ खाजगी वाहतूक नियंत्रक (ट्रॅफिक वॉर्डन) नेमण्यात यावेत, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. खाजगी नियंत्रकांमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल आणि गावात बेकायदेशीरपणे शिरणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Comments