सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत 'खेच्छेने केलेल्या व्यवसायाला मान्यता मिळावी' - स्वाधार संघ

 अमळनेर सत्तार खान ( प्रतिनिधी )



अमळनेरः सवों च न्यायालयाने २९ मे २०२६ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वाधार संघ, अमळनेर तर्फे स्वागत करण्यात आले. न्यायालयाने 'स्वेच्छेने व प्रौढ बयात केलेल्या वेश्याव्यवसायाला गुन्हा न मानण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत, अशा व्यक्तींना पोलिसांकडून होणाऱ्या छळ, अटक व मानवी हक्कांच्या उल्लंघनापासून संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्णयानंतर अमळनेर येथील स्वाधार संघाच्या

कार्यकर्त्या व सदस्यांनी एकत्र येत न्यायालयाच्या भूमिके बाबत समाधान व्यक्त केले. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून स्वेच्छेने हा व्यवसाय करणाऱ्या, परंतु समाजाच्या दृष्टीने 'अनैतिक' ठरविल्या गेलेल्या महिलांना कायदेशीर व सामाजिक संरक्षण मिळावे, यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. सर्वोच न्यायालयाने आज त्याला मान्यता दिली आहे.

आम्ही कोणालाही जबरदस्ती करत नाही. आमचा व्यवसाय

स्वेच्छेने, प्रौढ क्यात, आमच्या स्वतःच्या निर्णयाने करतो. तरीही वर्षानुवर्ष आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक मिळत होती. आज सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला 'माणूस' म्हणून पाहिले आहे. आमच्या हक्कांना मान्यता दिली आहे,' अशी भावना स्वाधार संघाच्या एका सदस्याने व्यक्त केली.

संघाने पुढे म्हटले की, या निर्णयामुळे केवळ कायदेशीर संरक्षणच नाही, तर समाजानेही आमच्याकडे मानवी हक्कांच्या दृष्टीने पाहावे, अशी अपेक्षा आहे. 'आमचा व्यवसाय कायदेशीर आहे, मग आमच्याकडे बोट का दाखवले जाते?' असा सवालही त्यांनी केला. स्वाधार संघाने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत, यापुढेही महिलांच्या सन्मान व हक्कांसाठी लढा सुरू राहील, असे सांगितले

Comments