अमळनेर से सत्तार खान
*अमळनेर, दि. १ जून २०२६* – प्रवास करणाऱ्या नागरिकांचा उन्हाचा आणि प्रवासाचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने अमळनेर येथील दाऊदी बोहरा समाजातील युवा बद्री ग्रुप आणि मयदी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर एसटी स्टँड परिसरात शीतपेय वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी १ ते दुपारी २ या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमाचा लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत असंख्य प्रवाशांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अमळनेर एसटी आगाराचे व्यवस्थापक श्री. प्रमोद बळीराम चौधरी यांचा दाऊदी बोहरा समाजाचे आमिल साहेब मुस्तफा भाई साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी १ जून रोजी असलेल्या एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छाही देण्यात आल्या.
या उपक्रमासाठी अमळनेर आगाराचे स्थानक प्रमुख श्री. अनिकेत वाल्मीक न्यायदे आणि वाहतूक निरीक्षक श्री. मुकेश ज्ञानेश्वर सैंदाणे हे विशेष उपस्थित होते.
दाऊदी बोहरा समाजाचे प्रमुख शेख अली हुसेन भाई सैफी, शेख मोहम्मद भाई करमपुरवाला, शेख अब्बास भाई सैफी, मकसूद बोहरी आणि जाकीर क्रोकरीवाला. कार्यक्रमा यशस्वीतेसाठी बद्री ग्रुपमधील मुल्ला हुसेन भाई इझी, मुस्तफा कलकत्तावाला ,अली असगर बोहरी, शब्बीर हुसेन मुफद्द्ल अकील शब्बीर अकील व मयदी ग्रुपमधील होजेफा सैफी, ताहेर इझी, अब्दुलकादर आझाद, हकीमुद्दीन बोहरी, शब्बीर बुकवाला, उबे सैफी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उन्हाच्या कडाक्यात प्रवाशांना दिलासा देणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे प्रवासी वर्गातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment