शेतकी संघाच्या निवडणूकीत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचा दणदणीत विजय

अमळनेर से सत्तार खान

15 पैकी 10 जागांवर विजय, भाजपला दोनच जागा मिळून दारुण पराभव

अमळनेर :- शेतकी संघाच्या निवडणूकीत आमदार

अनिल पाटील यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनलचा दणदणीत विजय होऊन त्यांच्या गटाला 15 पैकी दहा जागा मिळाल्याने निर्विवाद बहुमत मिळाले आहे.
तर काँग्रेसला तीन जागांचे समाधान मिळालेहोते, व्यक्तिशःच्या मतमोजणीत पॅनल टू पॅनलचा एव्हरेज लक्षात घेता राष्ट्रवादीला 2200 च्या आसपास पॅनल टू पॅनल मते मिळाली. काँग्रेसला साधारणपणे 1500 च्या आसपास पॅनल टू पॅनल मते मिळाली तर भाजपला एक हजारच्या आसपास पॅनल टू पॅनल मते मिळाली. तर बाद मतांची संख्याही राष्ट्रवादीची जास्त होती, अनेकांनी पॅनलच्या 5 उमेदवारासोबत सहावे मतदानही केल्याने ती मतपत्रिका बाद झाली. याचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला अन्यथा व्यक्तिशः मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजून दोन जागा वाढू शकल्या असत्या.

संपुर्ण निकाल पुढीलप्रमाणे

व्यक्तिशः मतदार संघात ७९२५ मतदान झाले होते. त्यात ८७३ मते बाद झाली. किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा सुभाष पाटील (३४५३), सुरेश पिरन पाटील (२८२८), प्रा श्याम पवार (२२८६), तर राष्ट्रवादी काँग्रेस गटात संभाजी पाटील (२९२५), संजय पुनाजी पाटील (२७५२) हे निवडून आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल शिसोदे यांचा थोड्या मतांनी पराभव झाला.

महिला मतदारसंघ महिला मतदार संघात ७ हजार ४२६ मतदान झाले, ६०५ अवैध ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुषमा वासुदेव देसले (३२५४), मालुबाई बापूराव पाटील (२७८६) हे विजयी झाले. भाजप एक व काँग्रेसच्या दोन्ही महिलांचा पराभव झाला. सोसायटी मतदारसंघ-सोसायटी मतदार संघात मतदान झाले त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीनखासदार स्मिताताई वाघ याच्या नेतृत्वातील पनलला फक्त दोन जागा मिळून त्यांचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार अनिल पाटील यांचे सहकार मध्ये वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध झाले असून अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वन वर असल्याचेही सिद्ध झाले आहे.

काल सकाळपासून इंदिरा भुवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सुरवातीला व्यक्तिशः मतदारसंघाची मोजणी झाली यात राष्ट्रवादी 2 व काँग्रेस 3 जागांवर विजयी झाले. या मतदारसंघात भाजपाला एकही खाते उघडता आले नाही. त्यानंतर महिला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही महिला विजयी झाल्या येथेही भाजपाला अपयश आले. त्यानंतर सोसायटी मतदारसंघात पाच पैकी 3 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले.तर भाजपाचा एका जागेवर विजय झाला. पाचव्या जागेसाठी दोन उमेदवारांना समान मते पडल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली यात भाजपचे प्रफुल पाटील विजयी झाले. यानंतर ओबीसी, एस सी एस टी आणि एन टी या तिन्ही जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला येथेही भाजपाला पुर्णतः अपयश आले. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर आमदार अनिल पाटील यांचा जयघोष करत गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला१२:४७



(७१), गणेश भामरे (६९), सचिन पाटील (५३), तर भाजपचे जितेंद्र पाटील (५३) विजयी झाले. प्रफुल पवार आणि महेश देशमुख यांना समान ५२ मते पडल्याने ईश्वर चिठी काढण्यात आली. त्यात प्रफुल पवार विजयी झाले.

ओबीसी मतदारसंघ ओबीसी मतदार संघात राष्ट्रवादीचे विक्रांत पाटील विजयी झाले. त्यांनी भाजपचे डॉ अनिल शिंदे व काँग्रेसचे दिनेश पवार यांचा पराभव केला.

एसी मतदारसंघ एस. सी. एस टी मतदार संघात राष्ट्रवादीचे शंकर बंडू बैसाणे विजयी झाले. त्यांनी भाजपचे ऍड एस एस ब्रह्मे यांचा पराभव केला.

Comments