अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान
▶️ *आरोपी*- 1) रवींद्र निंबा पाटील, - वय 42 वर्ष, सरपंच, ग्रामपंचायत नंदाने, ता. जि. - धुळे
▶️ *लाचेची मागणी-*
दि. 24.1.2025 रोजी 5,00,000/- रू . तडजोडीअंती 2,50,000/- रू.
पहिला हप्ता 1,00,000/-रु.
▶️ *लाच स्वीकारली*
दि. 24.01.2025 रोजी 1,00,000/-रु.
▶️ *लाचेचे कारण* - तक्रारदार यांच्या मालकीची मौजे नंदाने ता. जि. धुळे येथे गट नंबर 59/3 येथे शेतजमीन असून सदर जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळणे करिता विभागीय व्यवस्थापन नायरा एजन्सी लिमिटेड यांनी दि 01.09.2024 रोजी धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने सरपंच/ग्रामसेवक ग्रामपंचायत नंदाने ता. जि. धुळे यांच्या नावे सदरचा पेट्रोल पंप उभारणी करिता ना हरकत प्रमाणपत्र मिळणे करिता दिलेले पत्र तक्रारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांचे कडे जमा केले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे मित्र योगेश पाटील यांचे सह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय नंदाने येथे जाऊन आलोसे क्र.01 व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला असता आलोसे क्र. 01 यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतः करिता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांचे करिता 5,00,000/- रुपये लाचेची मागणी केल्याची आज दि. 24.01.2025 रोजी ला.प्र.वि. धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज रोजी पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान आलोसे क्र.01 यांनी 5,00,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यांचे सोबत हजर असलेले आरोपी क्र.02 यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 2,50,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 1,00,000/- रुपयाचा पहिला हप्ता स्वीकारल्याचे मान्य केले होते त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र.01 यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून 1,00,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारून आरोपी क्र.02 यांचेकडे दिली असता, त्यांनी ती स्वीकारून त्यांचे खिशात ठेवून घेतली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल म्हणून गुन्हा.
▶️ *हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.*
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी*- *मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग . नाशिक*
▶️ *परिवेक्षण अधिकारी*
*श्री सचिन साळुंखे*
*पोलीस उपअधीक्षक लाचलुतपत प्रतिबंधक विभाग धुळे*
मो. नं.9403747157,
9834202955*
▶️ *सापळा अधिकारी-*
*रूपाली खांडवी*
*. पोलीस निरीक्षक.*,
*ला.प्र. विभाग, धुळे*
*मो.नं. 8379961020*.
▶️ *सापळा पथक*-
*पो. हवा. राजन कदम, पो.कॉ. प्रशांत बागुल, सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट* .
▶️ **मार्गदर्शक* -
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर*
*पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र, नाशिक*
*मो.न. 9371957391*
*-------------------------------------------*
*याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसम याने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी,किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे 02562234020 येथे संपर्क करावा.*
*---------------------
*टोल फ्री क्रमांक *1064*
Comments
Post a Comment