एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ल्याचा अमळनेरयेथे निषेध

अमलनेर :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर मेरठ ते दिल्ली मार्गावरील टोलनाक्‍यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा अमळनेरयेथे निषेध करण्यात आला. स्‍थानिक एमआयएम पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाला निवेदन देत या घटनेतील हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी केली.यावेळी उपस्थित शहर अध्यक्ष सईद शेख,शहर उपध्यक्ष कलीम शेख,नईम पठान, अल्तमश शेख, मुस्तकीम मनियार,आकिब शेख, ,ईमरान खटीक, मोईज अली, शोएब सैय्यद,आदींची उपस्थिती होती. निवेदनात म्‍हटले आहे, खासदार ओवेसी यांच्यावर खुलेआम गोळीबार होणे देशाच्या कायदा सुव्यवस्‍थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. सरकारने त्‍यांना सुरक्षा व्यवस्‍था पुरवावी. या घटनेला सरकारने गांभीर्याने न घेतल्यास कार्यकर्ता शांत बसणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून विविध मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.

Comments