मा. डॉ.श्री.मोहन दहीकर, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, ठाणे परिक्षेत्र ठाणे, मा. श्री. शांताराम वळवी, पोलीस उप अधीक्षक, नाशिक विभाग , मा.हेमंतकुमार भामरे , पोलीस निरीक्षक, महामार्ग, धुळे विभाग यांचे मार्गदर्शन व आदेशान्वये

अमळनेर :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान
   
मा. अपर पोलीस महासंचालक श्री. कुलवंतकुमार सरंगल साहेब यांचे मार्गदर्शप्रमाणे व मा. श्रीमती. सुनीता साळुंखे-ठाकरे, पोलीस अधीक्षक, मुख्यालय, महामार्ग पोलीस, मुंबई, मा. डॉ.श्री.मोहन दहीकर, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, ठाणे परिक्षेत्र ठाणे, मा. श्री. शांताराम वळवी, पोलीस उप अधीक्षक, नाशिक विभाग , मा.हेमंतकुमार भामरे , पोलीस निरीक्षक, महामार्ग, धुळे विभाग यांचे मार्गदर्शन व आदेशान्वये आज दिनांक 09/02/2022 रोजी दुपारी 11 :00 ते दुपारी 14 :30 वा. दरम्यान महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी येथे हायवे मृत्युंजय दुत योजना संकल्पनेबाबत आपत्ती व्यवस्थापन व अपघात ग्रस्तांना प्रथमोपचार याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी महामार्ग पोलीस आणि दि रेझीलिएण्ट फाऊंडेशन, पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास म.पो.केंद्र हद्दीतील अपघात ग्रस्तांना मदत करणारे मृत्युंजय दूत व स्वयंसेवक तसेच अधिनस्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले, व त्यांना उपयुक्त माहिती देऊन त्यांचे कडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले, प्रशिक्षणासाठी रेसिलिएण्ट फाऊंडेशनचे श्री. रवींद्र कोडी पालघर, व त्यांचे सहकारी शैलेश मिश्रा, सिद्धेश कजरे, शेषनाग शुक्ला यांनी अपघात झाल्यानंतर जखमी इसमांना प्रथम उपचार कशा पद्धतीने करावा व कशा पद्धतीने त्यांचा जीव वाचवण्यात प्रथमोपचार पद्धतीचा फायद्याचा होईल व मृत्यूंजय दूत म्हणून आपण जखमीचे प्राण वाचविण्यात कसे यशस्वी होऊ शकतो याबाबत प्रात्यक्षिक स्वरूपात बहुमोल असे मार्गदर्शन केले यावेळी प्रशिक्षणासाठी म.पो.केंद्राचे सपोनि सुनिल मेढे, सपोनि किरण बर्गे, पोउनि राजेंद्र सोनवणे तसेच अंमलदार व म.पो.केंद्र हद्दीतील मृत्युंजय दूत तसेच वाहन चालक मालक हजर होते. सदर प्रशिक्षण उपस्थित मृत्युंजय दूत यांना प्रशिक्षण पूर्ण केल्या बाबत प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रम पूर्ण करण्याकरिता महामार्गा पाळधी कडील पोलीस अमलदार -
हेमंत महाडीक, प्रदिप नन्नवरे महामार्गचे चंद्रकांत सोनवणे, गिरीश शिंदे, किरण हिवराळे, अनिल सपकाळे, पवन देशमुख, दिपक पाटील यांनी मेहनत घेतली.

Comments