धरणगांव चौफुली पुलास राजमाता जिजाऊ उड्डाणपुल नाव देण्याची मागणीएरंडोलला समस्त पाटील समाज, विविध सामाजिक संघटनांची नपाकडे मागणी

 जिल्हा प्रतिनिधी / नुरुद्दीन मुल्लाजी एरंडोल

  जळगाव जिल्ह्यातील एरंडोल
 शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असून धरणगांव चौफुलीवरील उड्डाण पुलाचे काम सध्या सुरू आहे. सदरच्या उड्डाण पुलास राजमाता जिजाऊ उड्डाण पुल असे नाव देण्याची मागणी निवेदनाद्वारे एरंडोल नपा मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांचेकडे समस्त पाटील, मराठा समाज, विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, नागरीकांनी केली आहे. 
 सदर प्रस्तावित उड्डाण पुलास छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणार्‍या राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ मॉसाहेब उड्डाण पुल असे नाव दोन्ही बाजूने देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक प्रा. मनोज पाटील, डॉ. सुरेश पाटील, अमितदादा पाटील, अभिजीत पाटील, राजेंद्र शिंदे सर, रविंद्र पाटील, प्रा. शिवाजीराव अहिरराव, शकुंतला अहिरराव, मनिषा पाटील, वर्षा शिंदे, संभाजी इंगळे सर, स्वप्निल सावंत, प्रा. आर. एस. पाटील, के. डी. पाटील, अजय पाटील, राकेश पाटील, शेखर पाटील, हेमंत बाळकृष्ण पाटील, शरद पाटील, समाधान पाटील, स्वप्निल बोरसे, योगेश पाटील, एम. के. मराठे सर, डी. एस. पाटील सर, निलेश पाटील, दिपक बाविस्कर, कुंदन पाटील, एन. डी. पाटील, भाईदास बाजीराव पाटील, हेमंत मनोज पाटील, राज पाटील, निरज शिंदे, गजानन पाटील, सचिन पाटील, आर. झेड. पाटील सर आदींच्या सह्या आहेत.

Comments