मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघाततलाठी व वाहन चालक दोघांचा जागिच मृत्यू
शिरपूर :- ( प्रतिनिधि ) इम्रान शेख
ही कार चालक धनराज उर्फ दीपक विठ्ठल मराठे रा. मोहाडी धुळे हे चालवत होते तर सुनील प्रल्हाद मोहन हे मागच्या शिटवर बसले होते.यावेळी तीघेही कारने आर्वीकडे जात असतांना नाशिकहुन धुळेच्या दिशेने भरधाव येणाऱ्या एम एच 16 आर – 5992 क्रमांकाच्या इनोव्हा कारने दुभाज तोडून स्विफ्ट कारला जाऊन धडकली.यात स्विफ्ट कार मधील तलाठी हिरालाल रोकडे व चालक धुनराज ऊर्फ दीपक मराठे यांचा जागिच मृत्यू झाला.तर मागच्या शिटवर बसलेले सुनील मोहर.हे गंभीर जखमी झाले.घटनास्थळावरुन भरधाव इनोव्हा कार चालक फरार झाला घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली.क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले
Comments
Post a Comment