कासोदा येथे चोर्‍यांचे सत्र सुरू 17 तासात पोलिसांनी केले आरोपीस अटक.

कासोदा ता एरंडोल (प्रतिनिधी) नुरुद्दीन मुल्लाजी

   कासोदा तालुका एरंडोल: येथील गजबलेल्या बिर्ला चौक परिसरात गुरुवारी रात्री 10 फेब्रुवारी रोजी रात्रीचे एक ते दोन वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी बिर्ला चौकातील शेतकरी दामू श्रावण कुंभार हे शेतात गव्हाच्या पिकासाठी पाणी भरण्यास गेले असता तेव्हा त्यांच्या घरी त्यांच्या दोघे पत्नी व एक मुलगी खालच्या रूम मध्ये झोपले होते. याचा वरील मजल्यावर फायदा चोरट्यांनी घेऊन वरील मजल्यावर दुसऱ्या घराच्या छतावरून जाऊन उघड्या असलेल्या दरवाजाने त्यांच्या वरच्या मजल्यावर प्रवेश करून शेतकरी कपाशी विक्रीतून आलेले साठ हजार रुपये हे कुलूप लावलेल्या पत्री कोटी त ठेवलेले होते. कोणत्या कोटीचे कुलूप तोडून पाचशे रुपयाच्या शंभर नोटा व शंभर रुपयाच्या शंभर नोटा असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला परत खाली येऊन त्या चोरट्याने खालच्या मजल्यावर झोपलेली त्यांची मुलगी तिच्या उशाला जवळ ठेवलेला रेडमी कंपनीचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाइलही लंपास केला. तसेच बिर्ला चौकातील एच योगिता कृषी केंद्र या दुकानातून ही अंदाजे पाचशे ते सातशे रुपये चोरीस गेल्याची तक्रार राजेंद्र रामदास येवले यांनी पोलीस स्टेशनला दिली इतर दोन ठिकाणी शटर वाकवून कुलूप तोडून पैसे चोरण्याच्या इराद्याने करण्याचा प्रयत्न केला असता पण ते त्यांना 40 ते 50 रुपये असतात झाल्याची चर्चा आहे.
            ***** काही तासात आरोपी अटकेत*****
 बिर्ला चौकातील एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटा कैद झाल्यामुळे अवघ्या सतरा तासात सहाय्यक फौजदार सहदेव घुले पोलीस कॉन्स्टेबल जितेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल इमरान शेख व स्वप्निल परदेशी यांनी मुसक्या आवरून आरोपीला अटक केली. गेल्या 5 जानेवारी रोजी कासोदा आडगाव रस्त्यावर स्वामी समर्थ केंद्रा सह चार ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या. तशाच आशयाच्या चोऱ्या झाल्याचे दिसत आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे उलगडा झाल्या नसल्याने चोरांनी परत चोरी करण्याचे धाडस दाखवले. पुढील तपास पोलीस निरीक्षक नीता कायटे व नरेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहदेव घुले जितेश पाटील इम्रान पठाण स्वप्नील परदेशी हे करीत आहे

Comments