अमळनेर ( प्रतिनिधि ) :- सत्तार खान
तालुक्यातील मंगरूळ येथील आबासो अनिल अंबर पाटील हायस्कुल मध्ये धूम्रपान विरोधी दिन साजरा करून सर्व विध्यार्थ्यांना धूम्रपान विरोधी शपथ देण्यात आली. तर आरोग्य वर्धिनी उपकेंद्रातर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
तसेच विद्यार्थ्यांची धूम्रपान विरोध चित्रकला स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेच्या आधारे उत्तम प्रकारे चित्र रेखाटले. त्यात मुलींमध्ये साक्षी प्रवीण पाटील प्रथम तर प्रतीक्षा अनिल पाटील द्वितीय व मुलांमध्ये यश देविदास पाटील प्रथम तर मयूर किशोर पाटील द्वितीय आला आहे. विद्यार्थ्यांना आरोग्यवर्धिनी उपकेंद्र मंगरूळ मार्फत बक्षीस देण्यात आले.
या प्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ हेमंत कदम, हायस्कुल चे मुख्याध्यापक प्रकाश पाटील , संजय पाटील , प्रभूदास पाटील , अशोक सुर्यवशी , सुषमा सोनवणे , शीतल चव्हाण , सीमा मोरे ,आरोग्य सेवक सी एम पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment