कोरोना काळात बंद झालेल्या शाळा किमान ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत तसेच आरटीई अनुदान वाटपातील दिरंगाई बाबत आमदारांना दिले निवेदन

.
.अमळनेर . ( प्रतिनिधि ) सत्तार खान

 गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे सर्व जग वेठीस धरले गेले आहे . असा कुठलाही व्यवसाय किंवा व्यवस्था
नाही ज्याच्यावर या महामारीचा परिणाम झाला नाही . आताशी कुठे परिस्थिती निवळायला सुरुवात झाली होती त्याच्यातच आता
नवीन आलेल्या व्हेरीएंट परत धुमाकुळ घालायला सुरुवात केली आणि परत सर्व क्षेत्रात त्याचा परिणाम दिसायला सुरुवात झाली . मध्यंतरीच्या काळात मा .आरोग्यमंत्री श्री राजेशजी टोपे यांचे विधान आले की हा व्हेरिएंट तितकासा घातक नाही त्यामुळे
शाळा बंद करण्याचा सध्या विचार नाही आणि जर गरज पडलीच तर स्थानिक प्रशासनावर त्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र देण्यात येइल . लग्न सोहळे व मंदिरे इतकेच काय की वियर वार सुध्दा काही क्षमतेने सुरू राहतील असा आदेश महाराष्ट्र शासनाने काढला मग शाळांबावतच हा दुजाभाव का? शाळाही ५० टक्के क्षमतेने सुरू राहू दयाव्यात जेणेकरून येणारी पिढी घडू
शकेल . त्यांचे जे दोन वर्षात शैक्षणिक नुकसान झालेले आहे ते भरून निघेल आताशी कुठे विधार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यायला सरूवात झाली होती परंतू महिन्याभरात लगेच निर्वध लादुन शासन त्यांचा शैक्षणिक नुकसान करू पाहते आहे.
-पुष्कळश्या पालंकाकडे मोवाइल व इंटरनेट सुविधा नसल्याने विधार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य होत नसल्याने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ चे उल्लंघन होत असल्याने सरसकट शाळा बंदचा निर्णय मागे घ्यावा . व विधार्थ्याचे होणारे
शैक्षणिक नुकसान टाळावे . अशा आशयाचे निवेदन एम्सा संघटनेच्या वतीने देण्यात आले त्यावर मा आमदार श्री अनिल दादा पाटील यांनी ३० जानेवारी पर्यंत निर्णय होईल असे तोंडी आश्वासन दिले .
तसेच आरटीई मान्यता प्राप्त शाळांना शासनातर्फे दर वर्षी अनुदान वाटप करण्यात येते परंतू या वर्षी आक्टोबर महीन्यापासुन शासनाकडून १00 कोटी इतके अनुदान प्राप्त होऊनही अदयाप त्याचे वाटप करण्यात आलेले नाही. त्या विषयी संघटनांनी तक्रार केल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचलनालया कडून १५ डिसेंबर २०२१ रोजी सर्व शिक्षणाधिकारी यांना पत्र काढून ३१ डिसेंबर २०२१ च्या आत निधी वाटप करण्याच्या सुचना करण्यात आली होती परंतु आजतागायत निधी वाटप करण्यात आलेला नाही व शिक्षणाधिकारी पत्रात नमुद केल्याप्रमाणे कुठल्याही संस्था चालक मुख्याध्यापक किंवा संघटना यांची सहविचार सभा न घेता
परस्पर निर्णय घेत आहेत अशा आशयाचे निवेदन ही आमदारांना देण्यात आले . यावर वरिष्ठांशी बोलून निर्णय घेतला जाईल असे मा आमदार श्री अनिल दादा पाटील यांनी सांगितले निवेदनावर एम्सा संघटनेचे अध्यक्ष श्री उत्कर्ष पवार सचिव श्री तुषार पाटील श्री अविनाश पाटील सदस्य श्री चंद्रकांत भदाणे
यांच्या सहया आहेत.

Comments