कसोदा येथील संताजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुरेश उत्तम ठाकरे यांची बिनविरोध निवड

कासोदा :- ( प्रतिनिधि ) नुरुद्दिन मुल्लाजी


  कसोदा येथील संताजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ.दिनकर रामदास पाटील यांनी चेअरमन पदाच्या राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी नविन निवड घेण्यात आली.त्यात सुरेश ठाकरे यांच्या एकमेव अर्ज आल्याने सुरेश उत्तम ठाकरे यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्रेणी२श्री एस डी पाटील साहेब यांनी काम पाहिले.याप्रसंगी संताजी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव गुरुजी, संजय बोरसे सर, हिरालाल चौधरी, डॉ.दिनकर पाटील, राजेंद्र शिंपी,महादू भोई,सुरेशसिंग परदेशी,सौ.वंदनबाई चौधरी,सौ.कल्पनाबाई चौधरी,व्यवस्थापक राजेंद्र जाधव, क्लार्क सतिष चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, साहेबराव चौधरी आदी उपस्थित होते.सदर निवड शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Comments