कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) नुरुद्दीन मुल्लाजी
एरंडोल : ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड च्या संस्थेच्या अध्यक्षपदी जयवंतराव मन्साराम पाटील यांची तर ऑनररी सेक्रेटरी देविदास आबा पाटील यांची निवड झाली . संस्थेच्या ज्येष्ठ संचालक वाय के पाटील यांचा सत्कार टि डि एफ चे तालुकाध्यक्ष तथा आडगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रमोद पाटील चिलाणेकर व स्व शिवचंदभाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगदीश पाटील यांनी सत्कार केला . यावेळी सेक्रेटरी देविदास आबा पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला . अनुभवामुळे मनुष्य शिखर नक्कीच गाठू शकतो व यशस्वी होतो .आमच्या अनुभवाचा संस्थेला नक्कीच उपयोग होत असतो . नविन पिढीने याचा आदर्श घ्यावा . जयवंतराव पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे . विदयार्थांच्या शैक्षणिक विकासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत . राजकारणापलिकडे संस्थेचे कार्य होईल . यावेळी अमळनेर फ्रुटसेल सहकारी संस्थेचे चेअरमन शामकांत पाटील उपस्थित होते . प्रमोद पाटील चिलाणेकर जगदीश पाटील यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले .
Comments
Post a Comment