अमळनेर येथील मुस्लिम बांधवांनी आवास संस्थेच्या माध्यमातून कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींना विविध धर्मांच्या

अमळनेर :- ( प्रतिनिधी ) सत्तार खान

 ( प्रतिनिधी ) अमळनेर येथील मुस्लिम बांधवांनी आवास संस्थेच्या माध्यमातून कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींना विविध धर्मांच्या रितीरिवाज प्रमाणे मोफत अंत्यविधी केले होते म्हणून आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील पोलिस लाईन मैदानावर महसूल विभाग उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने आवास फाऊंडेशनचे अध्यक्ष अशफाक बशीरोद्दीन शेख , गुलाम नबी पठाण, नविद शेख, सैय्यद अहेमद अली, जाविद खाँ पठाण, मजहर शेख, जमालोदीन शेख, अमजदअली शाह, इंजि इम्रान कुरैशी, असलम खान पठाण, यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले
           यावेळी आमदार भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील, प्रांत अधिकारी सिमा आहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलिस निरीक्षक, जयपाल हिरे, जिल्हा परिषद सदस्य जयश्री ताई पाटील,सह आदि मान्यवर उपस्थित होते सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संजय पाटील सर यांनी केले

Comments