आर सी पटेल उर्दू माध्यमिक विद्यालयातील चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

शिरपुर :- ( प्रतिनिधी ) इम्रान शेख

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 चा निकाल नुकतेच जाहीर करण्यात आला आहे यात आर सी पटेल उर्दु माध्यमिक विद्यालय शिरपूर येथील एकूण चार विद्यार्थी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत आले आहेत यात , मिर्झा तहरीम अल्ताफ बेग 142 गुण घेऊन 88 ,तर शेख मोहम्मद साहिल साबीर 140 गुण घेऊन 94 नंबर वर आले आहेत.
गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे माझी शालेय शिक्षण व क्रीडामंत्री अमरीश भाई पटेल, शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष माननीय जयश्री बेन पटेल, संस्थेचे अध्यक्ष व शिरपुर वरवाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माननीय भूपेश भाई पटेल, उपाध्यक्ष माननीय राज गोपाल भंडारी संस्थेचे चेअरमन माननीय प्रभाकर राव चव्हाण संस्थेचे संचालक हाजी काजी फिरोज तसेच शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर मुबिनोद्दीन यांनी कौतुक केले विद्यार्थ्यांच्या यशासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments