अमळनेर :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान
शहरप्रतिनिधी, येथील मराठा सेवा संघ व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने शहरातील तहसील कार्यालया समोरील माँ जिजाऊ प्रवेशद्वार वरील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
महाराष्ट्राला दोन छत्रपती देणारे तथा ताट मानाने जगता यावे म्हणून स्वराज्याची संकल्पना उदयास आनणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती उत्सव दिनानिमित्त संपूर्ण देशात उत्स्फूर्तपणे उत्सव साजरा करण्यात येत असतो.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळत अमळनेर येथिल तहसील कार्यालया समोरील जिजाऊ प्रवेश द्वार स्मारकावरील राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी शिवव्याख्याते प्रा डॉ लिलाधर पाटील यांनी उपस्थित जन समुदया समोर राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत सर्वांनी माँसाहेब जिजाऊ च्या चरित्राचे वाचन करून आपल्या कुटुंबातील महिलांना जिजाऊंची प्रेरणा देऊन स्वकर्तुत्वाने जगण्याची ताकत द्यावी, असे संबोधले.
याप्रसंगी प्रा लिलाधर पाटील, नगरसेवक श्यामभाऊ पाटील,आप्पासाहेब एस एम पाटील, अहिरराव सर,ठाकरे सर, रणजित शिंदे, प्रा डॉ विलास पाटील, आर बी पाटील, कैलास पाटील, संदिप खैरनार सर, बी एल सैदाने,जयेश काटे,श्रीकांत चिखलोदकर, अनंत सूर्यवंशी, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, प्रेमराज पवार, निंबाजी पाटील,विजय गाढे,आत्माराम अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट.....
नगरसेवक श्याम पाटील यांच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व विवेकानंद यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व या प्रसंगी संदीप खैरनार यांनी मराठा सेवा संघ शिवधर्म दिनदर्शिका चे वितरण केले.
Comments
Post a Comment