*अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरची एसटी आगारास भेट*

 
अमळनेर- ( प्रतिनिधि ) सत्तार खान

 ३१ डिसेंबर २०२१ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अंमळनेर चे पदाधिकाऱ्यांनी ग्राहक पंधरवडा या अंतर्गत एसटी आगार आगारप्रमुख सौ अर्चना भदाणे यांची भेट घेतली. सर्वप्रथम त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष एडवोकेट भारती अग्रवाल यांनी स्वागत केले. याप्रसंगी प्रवाशांची असलेल्या काही तक्रारी बाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा अंतर्गत बससेवा ह्या थोड्या प्रमाणात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अमळनेर ते जळगाव व अमळनेर ते पारोळा या बस सेवा येजा काही प्रमाणात सुरळीतपणे चालू असल्याचे एसटी आगार प्रमुख सौ भदाणे यांनी सांगितले. अमळनेर येथील आगाराचे सर्व कर्मचारी सर्व विभागाचे योग्य प्रमाणात कार्य करीत असल्याचे व सहकार्य देत असल्याचे त्यांनी नमूद केले. संप सुरू असल्याने आपण प्रवाशांना योग्य प्रकारे सेवा देऊ शकत नसल्याबद्दल खंत त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी एसटी आगाराचे अकाउंटंट श्री बी सी महाजन, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री सतीश सातपुते तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळ्नेर तर्फे अध्यक्ष सौ भारती एडवोकेट भारती अग्रवाल , जिल्हा निरीक्षक मकसूद भाई बोहरी, सौ कपिला मुठे, मधुकर सोनार व सौ मैराळे मॅडम उपस्थित होते.

Comments