शिरपुर :- ( प्रतिनिधी ) इम्रान शेख
आज दि. 23 जानेवारी 2022 वार रविवार रोजी दुपारी ठीक 3:00 वाजता *डॉ. जुम्मा साहेब, शिरपूर तालुका अध्यक्ष, AIMIM* ( जिल्हा धुळे ) व त्यांच्या कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची भारत मुक्ती मोर्चा व तिच्या सहयोगी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या भागीदारी परिवर्तन मोर्चा या गटबंधन वर चर्चा केली व झालेल्या गठबंधन बाबत समाधान व आनंद व्यक्त केला.
त्या नंतर मा. अजयभाऊ मंगळे, धुळे जिल्हा अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा व भटूभाऊ पाटोळे यांनी डॉ.जुम्मा साहेब, शिरपूर तालुका AIMIM अध्यक्ष यांचे गुलाब पुष्प देऊन गठबंधन झाल्याबद्दल आभार व्यक्त केले.
तसेच येणाऱ्या काळात जनतेच्या प्रमुख मुद्द्यावर एकत्रित येऊन एकमेकांच्या साथ सहयोगाने काम करण्याची आशा व्यक्त केली.
यावेळी AIMIM व भारत मुक्ती मोर्चाचे प्रमुख तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment