अमळनेर शहर :- ( प्रतिनिधी ) सत्तार खान
अमळनेर येथील शहरातील मोटरचोरी प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश प्राप्त झाले आहे.
अमळनेर शहरातील सुजान मंगल कार्यालय जवळ पार्किग मधून दि.13.12.2021 रोजी दुपारी 12.00 ते 15.30 वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात
चोरटयाने चोरून नेली होती बाबत अमळनेर पो.स्टे.गुरनं. 552/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर
गुन्ह्याचा तपास सफौ.857 रामकृष्ण पुंजू कुमावत हे करीत होते.
अमळनेर शहरात मोटार सायकल चोरीचे बरेच गुन्हे दाखल झालेले असतांना सदर गुन्हयातील अनोळखी चोरट्याचा शोध
घेणे बाबत मा.डॉ.श्री.प्रविण मुंढे सो. पोलीस अधिक्षक जळगांव यांनी आदेश दिले होते.तसेच मा.श्री.रमेश चोपडे सो. अपर पोलीस अधिक्षक सो
चाळीसगांव व मा.श्री.राकेश जाधव सो. उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे सदर गुन्ह्याचा तपासात
श्री.जयपाल हिरे पोलीस निरीक्षक अमळनेर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार इसम भुषण शांताराम पाटील रा.तांबेपुरा अमळनेर हा त्याचे साथीदारासह मोटर सायकली चोरी करीत असतो बाबत माहीती मिळाली वरुन त्यांनी तपास पथकातील सफौ.रामकृष्ण पुंजू
कुमावत ,सफौ,बापु साळूखे ,पोहेकाँ, सुनिल हाटकर ,पोना मिलींद भामरे ,पोना, दिपक माळी ,पोना,सुर्यकांत साळुखे ,पोकॉ,रविंद्र पाटील अशांना सुचना देवुन रवाना केले होते त्यानी नमुद इसमांस ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांने त्याचे साथीदार 1) गजानन दिलीप ताकतोडे रा
गांधलीपुरा अमळनेर,2) विक्की जवाहरलाल सोनवणे रा.सानेनगर तांबेपुरा अमळनेर,3)संभाजी बाळू पाटील रा. सातरणे ता.जि.धळे अशांनी संगन मताने काही महिन्यापासुन वेग वेगळ्या ठिकाणहून मोटार सायकली चोरी केले असल्याबाबत सांगुन नमुद आरोपीतांना ताब्यात घेवुन त्याच्या कडुन मोटर सायकली हस्तगत करण्यात आल्या त्या एकूण 242000/- किमतीच्या 10 मोटर सायकली असलेला मुद्देमाल हस्तगत करून आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा तपास सफौ. रामकृष्ण पुंजू कुमावत हे करित असुन आरोपी हे मा.न्यायालयाकडुन पोलीस कस्टडी रिमांडवर आहेत.
.
Comments
Post a Comment