अमलनेस :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान
अमळनेर येथे रविवारी काँग्रेस कमिटीचा राज्यस्तरीय जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डाॅ उल्हासदादा पाटील यांची देखील उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संघटना बांधणीबाबत यथोचित मार्गदर्शन केले. त्यांचा स्वागत सत्कार जेष्ठ नेते संदीप पाटील, प्रविण जैन, माजी युवक तालुकाध्यक्ष गजेंद्र साळुंखे, अमळनेर तालुका शेतकी संघाचे नवनिर्वाचित प्रशासक,तथा अमळनेर तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अलिम मुजावर यांनी केला.
यावेळी अमळनेर तालुका शेतकी संघावर नव्यानेच नियुक्त झालेल्या काँग्रेस अल्पसंख्यांक नेते अलिम मुजावर यांचे डाॅ.पाटील यांनी अभिनंदनपर सत्कार सन्मान करून भारदस्त शब्दांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. अलिम मुजावर यांनी डाॅ उल्हास पाटील यांच्यासमोर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या संदर्भ देत पक्ष संघटना उभारणीबाबत चर्चा केली. यावेळी अल्पसंख्यांक विभागाकडून होत अस
लेल्या संघटनात्मक कामांची माहीती श्री. मुजावर यांनी डाॅ. उल्हास पाटील यांना दिली.
Comments
Post a Comment