"विचार परिवर्तन केल्याशिवाय समाज परिवर्तन शक्य नाही"

अमळनेर( प्रतिनिधि ) सत्तार खान

"विचार परिवर्तन केल्याशिवाय समाज परिवर्तन शक्य नाही"
या मूलभूत व महत्वाच्या विषयावर प्रबोधन व्हावे या हेतूने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक व वक्ते
शिवश्री गंगाधर बनबरे (पुणे)
यांचे व्याख्यान दिनांक आज ११ डिसेंबर २०२१ रोजी IMA हॉल, जी एस हायस्कूल, अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.
          कार्यक्रम अध्यक्षस्थानी ओ बी सी संघाचे जिल्हाध्यक्ष डी.डी.पाटील हे असतील. अमळनेर तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्मृतिशेष शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ क्रांतिसूर्य जोतीराव फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रबोधन व्याख्यांनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाच्या वैचारिक परिवर्तन चळवळीत योगदान देण्यासाठी व्यक्तिशः उपस्थित राहून आपल्या संपर्कातील व्यक्तींनाही आमंत्रित करा असे आवाहन राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत युवा कल्याण प्रतिष्ठाण यांचेसह नागरी हित दक्षता समिती,मराठा सेवा संघ,राष्ट्र सेवा दल,राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, समता परिषद,युथ सेवा फाऊंडेशन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद,प्रोटॉन शिक्षक संघटना , भारत मुक्ती मोर्चा,व्यवस्था परिवर्तन मंच,शिव बहुद्देशिय प्रतिष्ठान आदि संघटनांचे पदाधिकारी यांनी केले आहे.

Comments