नुकतेच अमळनेर तालुका शेतकी संघात नवीन प्रशासक मंडळ रुजू झाले.




अमलनेर :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान

नुकतेच अमळनेर तालुका शेतकी संघात नवीन प्रशासक मंडळ रुजू झाले. त्यात अमळनेर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष तथा धार गावाचे माजी उपसरपंच अलिम मुजावर यांची देखील प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीनंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन व सत्कार सन्मान होत आहेत. काल धार ता अमळनेर येथे अलिम मुजावर यांचा मुस्लिम समाजाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजाला अलिम मुजावर यांच्या नियुक्तीने अमळनेर विधानसभेचे आमदार भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील यांनी न्याय मिळवून दिला असा सूर सर्वत्र उमटला. सर्वांनी मिळून अलिम मुजावर यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी धार वि का सोसायटीचे चेअरमन व्ही.एन मुजावर, ग्रामपंचायत सदस्य सत्तार मुजावर, बाबु पेंटर, हाजी कलीम मुजावर, गयासुद्दीन मुजावर, राजीक मुजावर, नईम पठाण, निमन मुजावर, मंजूर जुबेर, राजु शकुर मुजावर, ईमाम साहेब, शोकत मुजावर, दानिश मुजावर आदी जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

Comments