दाऊदी बोहरा समाज तर्फे ५३ वे धर्मगुरू सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन त.ऊ.श यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप व कपडे वाटप.*


अमळनेर :- प्रतिनिधि सत्तार खान

 दि. ०५/१२/२०२१ रोजी बुर्‍हानी गार्डस इंटरनॅशनल या तरुण सेवाभावी संस्था मार्फत अन्नधान्याचे ६००पॅकेट कपडे व गोधड्या गरजूंना वाटप करण्यात आले. याप्रसंगी दाऊदी बोहरा समाजाचे अध्यक्ष शे.एहसान भाई बुर्‍हानी,शे. मोहम्मद भाई करंमपूरवाला,शे.अलीहुसेन भाई सैफी,शे.अजहर भाई फक्री, मु अब्बास भाई सैफी,मुस्तफा भाई जावेद,मोइझ भाई बोहरी,इद्रीस भाई अल्लाबक्ष,हुसेन भाई अल्लाबक्ष,जुजर भाई अकील,शब्बीर भाई साकी, हुसेन भाई सैफी,जाकीर भाई बोहरी, व बुर्‍हानी गार्डस अमळनेर चे कॅप्टन ताहा अल्लाबक्ष,व्हाईस कॅप्टन अजिज बोहरी,हुसेन बोहरी,हुसेन सैफी,हुझेफा इझी, अलीअसगर अल्लाबक्ष,अब्दुलकादिर सैफी,अलीअजगर केरोनावाला,मुस्तुफा कलकत्तावाला यांनी हा प्रोजेक्ट यशस्वी करण्याकरता विशेष प्रयत्न केले अशी बातमी पी आर ओ मकसूद भाई बोहरी कळवितात.

Comments