अमलनेर :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान
दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांनी नगरपरिषद अमळनेर येथे उपमुख्याधिकारी श्री संदीप गायकवाड यांना व अमळनेर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे
त्यात त्यांनी म्हटले आहे की आपल्या अमळनेर शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक लहान मुले, तरुण पतंग उडवीत असतात. परंतु त्यासाठी वापरला जाणारा चायनीज मांजा किंवा धागा हा घातक असून रस्त्यावर आणि झाडावर इकडेतिकडे अडकलेला आहे. पक्ष्यांना सुद्धा याची हानी पोहोचते.सबब कोणतीही जीवित आणि अथवा दुर्घटना होऊ शकते याकरता आपण विशेष काळजी घेऊन योग्य ती मोहीम राबवावी व लोकांना या गोष्टीपासून परावृत्त करावे व ही अनुचित व्यापारी प्रथा बंद करावी. अशी विनंती या निवेदनात करण्यात आलेली आहे
.
याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे जळगाव जिल्हा निरीक्षक मकसूद बोहरी सायबर बैंकिंग प्रमुख विजय शुक्ल व ऊर्जा समिती प्रमुख सुनील वाघ व प्रसिद्धी प्रमुख जयंतलाल वानखेडे उपस्थित होते.
Comments
Post a Comment