अमळनेर शहर ए आय एम आय एम च्या वतीने अमळनेर मार्गाने जाणारे सर्व गाड्या सुरू करावी

अमळनेर ( प्रतिनिधी ) सत्तार खान

अमळनेर शहर ए आय एम आय एम च्या वतीने अमळनेर मार्गाने जाणारे सर्व गाड्या सुरू करावी व एक्स्प्रेस गाड्यांची लोकल टिकट सेवा ही तातडीने सुरू करण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन रेल्वे स्टेशन मास्तर यांच्या मार्फत पश्चिम रेल्वे चे जी एम श्री आलोक कन्सल व जळगांव लोकसभाचे सदस्य खासदार उन्मेष दादा पाटील यांना देण्यात आले
          ए आय एम आय एम च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अमळनेर रेल्वे स्टेशन वरून जाणारी सर्व एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या तातडीने सुरू करण्यात यावी आणि संपूर्ण एक्स्प्रेस गाड्यांची लोकल टिकट सेवा ही सुरू करण्यात यावे अमळनेर हुन सकाळी सात वाजता भुसावळ कडे जाणारी सुरत भुसावळ पॅसेंजर गाडी तात्काळ सुरू करण्यात यावी कारण या गाडीने अमळनेर ते जळगांव दररोज हजारो लोक अप डाउन करतात तसेच 09078 भुसावळ नंदूरबार पॅसेंजर ही गाडी सुरत प्रयत्न करावी अमरावती एक्स्प्रेस ही गाडी दररोज करण्यात यावी, विशेष म्हणजे पॅसेंजर गाडीचे टिकट दर आजही एक्स्प्रेसच्या नुसार घेतले जाते सदरील टिकीटाचे दर तात्काळ कमी करावे, आणि संपूर्ण एक्स्प्रेस गाड्यांची लोकल टिकट सेवा ही सुरू करावी अमळनेर रेल्वे स्थानकावरून जाणारे सर्व गाड्या लवकरात लवकर सुरू करण्यात यावी यावेळी ए आय एम आय एम चे तालुकाध्यक्ष अजहर शेखज् , शहराध्यक्ष हाजी सईद शेख , कलीम शेख हाजी जलालोदीन , हसन शाह , असलम शाह उपस्थित होते

Comments