सेवाभावी बहुउद्देशीय संस्था आवास फाउंडेशनच्या वतीने वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद यांना लेखी निवेदन‌

अमळनेर ( प्रतिनिधी ) येथील सेवाभावी बहुउद्देशीय संस्था आवास फाउंडेशनच्या वतीने वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद यांना लेखी निवेदन‌ देऊन वक्फ बोर्डाचे विभागीय कार्यालय जळगांव येथे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आवास संस्था तर्फे देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की
वक्फ बोर्डाचे विभागीय कार्यालय जळगांव येथे तात्काळ सुरू करण्यात यावे
         वक्फ बोर्डाचे कामासाठी औरंगाबाद येथे येण्या जाण्याचे अंतर जास्त होते म्हणून वक्फ बोर्डाच्या विभागीय कार्यालय जळगांव येथे सुरू करण्यात यावे सदरील कार्यालय खानदेशातील जळगांव येथे सुरू झाल्याने जळगांव, धुळे, नंदूरबार,व बुलडाणा या चार जिल्ह्यांना सोयिस्कर होईल अशी मागणी करण्यात आली आहे

Comments