*महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना तालुक्यात सुरू करावे : सुन्नी दारूल कज़ा ची आमदारांकडे मागणी*अमळनेर
( प्रतिनिधी अ. सत्तार खान ) अमळनेर शहरातील फैजाने चिशतीया बहुउद्देशीय संस्था संचलित सुन्नी दारूल कज़ा च्या वतीने तालुक्यात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना तातडीने सुरू करावी असे मागणीचे लेखी निवेदनाद्वारे आमदार भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील यांच्या कडे मागणी केली
सुन्नी दारूल कज़ा च्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील गोरगरीब बांधवांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना तातडीने सुरू करण्यात यावी
आपल्या तालुक्यातील जनतेला सदरील योजनेसाठी जळगांव, धुळे, नासिक येथे जावे लागते आपल्या जिल्ह्यातील पाचोरा जामनेर चोपडा आदि तालुक्यात ही योजना सुरू झालेली आहे आपल्या तालुक्यात हे लवकरात लवकर ही योजना सुरू करण्यात यावी यावेळी सुन्नी दारूल कज़ा चे अध्यक्ष फयाज पठाण कुरैशी, अब्दुल सत्तार मास्टर, हाजी अब्दुल कादर जनाब, हाजी शेखा मिस्तरी, फिरोज मिस्तरी, जावेद अख्तर सर, रफीक मिस्तरी, शब्बीर खाटीक सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, सह आदि उपस्थित होते
Comments
Post a Comment