आमदार फारूक शाह यांची दमदार कामगिरी..! राज्यातील अनेक कब्रस्तान येथे संरक्षण भिंत व विविध विकास कामांसाठी येणाऱ्या अडचणी कायमस्वरूपी दूर
*आमदार फारूक शाह यांची दमदार कामगिरी..! राज्यातील अनेक कब्रस्तान येथे संरक्षण भिंत व विविध विकास कामांसाठी येणाऱ्या अडचणी कायमस्वरूपी दूर..!*
*आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नातून आणि नवाब मलिक मंत्री अल्पसंख्याक विकास यांच्या माध्यमातून याबाबतीत झाला शासन निर्णय..!*
(धुळे दि. १८-०५-२०२१) धुळे शहर विधानसभा मतदार संघात मोगलाई कब्रस्तान व देवपुर कब्रस्तान या दोन्ही कब्रस्तानसाठी संरक्षण भिंत उभारण्यामच्या कामाला शासनाकडून मंजुरी मिळाली होती त्यासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला होता. परंतु केवळ प्रस्तावित बांधकाम करण्यात येणाऱ्या जागा या शासकीय नसून पंचमंडळ व ट्रस्टच्या नावावर असल्याने केवळ यासारख्या जागा असलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत नाही. असे आदेश कब्रस्तानच्या बाबतीत प्रशासनाकडून देवून कब्रस्तानमधील कामांना खीळ बसली होती. महाराष्ट्र राज्यातील ९०% कब्रस्तान हे पंचमंडळ व ट्रस्टच्या नावावर असल्याने फक्त १०% कब्रस्तान हे शासकीय जागांवर आहे. तरी सुद्धा त्या त्या जिल्ह्यातील संबंधीत कार्यान्वित यंत्रणा अशा प्रकरणांना मंजुरी देत नसल्याच्या तक्रारी आमदार फारूक शाह यांना प्राप्त झालेल्या होत्या. परंतु वरील कारण सांगून असे अल्पसंख्याक विकास निधीची अनेक प्रकरणांना संरक्षण भिंत अथवा विकास कामांना अडचणी येत होत्या.
सदरचा विषय जनतेच्या भावनांशी निगडीत असून अल्पसंख्याक विकास निधीच्या कामांना पंचमंडळ व ट्रस्टच्या नावावरील जागा मालकीची कागदपत्रे आणि ७/१२ ची कारणे सांगून प्रशासकीय मान्यता प्रदान करत नसल्याचा प्रश्न आमदार शाह यांना सतावत होता. आज त्यांनी याचा सखोल अभ्यास करत व राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री यांच्या सहकार्याने त्यांची मुंबई येथे भेट घेत उपरोक्त प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला. याबाबत आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नातून आणि नवाब मलिक मंत्री अल्पसंख्याक विकास यांच्या माध्यमातून राज्यातील सर्वच कब्रस्तान येथे संरक्षण भिंत व कब्रस्तानच्या विविध विकास कामांसाठी येणाऱ्या अडचणी कायमस्वरूपी दूर झाल्या असून सर्वच जिल्ह्यातील संबंधीत कार्यान्वित यंत्रणांनी कब्रस्तानच्या अश्या प्रकरणांना मंजुरी देत कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी असा शासन निर्णय करण्यात आला.
कृपया प्रसिद्धीसाठी दि. १८-०५-२०२१
आपला
शाह फारूक अन्वर
आमदार, धुळे शहर
Comments
Post a Comment